Store: Kulkarni's Ruhi Foods
Green Chilli Pickle / हिरव्या मिरचीचे लोणचे
ताज्या हिरव्या मिरच्यांपासून व पारंपरिक मसाल्यांच्या मिश्रणातून तयार केलेले झणझणीत लोणचे. जेवणाला खास तिखटपणा, चव आणि अस्सल घरगुती स्वाद देणारे.
ताज्या व कडक हिरव्या मिरच्यांपासून पारंपरिक घरगुती पद्धतीने तयार केलेले हिरव्या मिरचीचे लोणचे झणझणीत चव आणि तीव्र तिखटपणासाठी ओळखले जाते. मोहरी, मेथी, हिंग, हळद व इतर निवडक मसाल्यांचे संतुलित मिश्रण वापरून हे लोणचे काळजीपूर्वक मुरवले जाते, ज्यामुळे याला खास सुगंध आणि खोल चव मिळते. योग्य प्रमाणात तेल व मसाल्यांमुळे लोणचे दीर्घकाळ टिकते. भाकरी, पोळी, वरण-भात किंवा साध्या जेवणासोबत खाल्ल्यास जेवणाची चव खुलवणारे हे लोणचे अस्सल घरगुती परंपरेचा अनुभव देते.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
Comments